Monday, 20 May 2013


Jaagtik Kutumb Din.

Imageआंतरराष्ट्रीय कुटुंब दिन.  माणसांनी भरलेलं घर. एकत्र बसणारी पंगत.आजी आजोबांच्या गोष्टी, रुसव्या फुगव्यांची गंमत. हे चित्र आहे सध्या हरवत चाललेले आहे. सध्याच्या डॉट कॉम संस्कृतीत भौतिक जीवनाला आलेले महत्त्व आणि त्यामुळे दुरावलेली माणसे अशा परिस्थितीत आजच्या आंतरराट्रीय कुटुंब दिनाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. पूर्वी कुटुंब समुपदेशनाची गरज भासत नव्हती. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे जे संस्कार व्हयचे त्यांचाच आज अभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे कुटुंबात बर्‍याच समस्या जाणवू लागल्या आहेत. विवाहपूर्व समुपदेशनामुळे एकमेकांच्या आवडी, विचार, कौटुंबिक परिस्थिती समजून घेण्यास मदत होते, प्रेमविवाह करणे चूक नसले तरी प्रत्यक्ष परिस्थिती समजून न घेतल्याने मतभेद निर्माण होतात. पालक आणि मुलांना दूर नेणारा विषय म्हणजे करिअर. मात्र मुलांना त्यांची कुवत आणि आपली परिस्थिती यांची सुसंवादातून जाणीव करून दिल्यास हा प्रo्न सुटण्यासारखा आहे. अतिअपेक्षा,अतिकाळजी,टीका करणे इ.गोष्टी टाळून मुलांवर संस्कार करणे अधिक योग्य ठरते. सध्या कामाचा व्याप वाढला असला तरी ठरवून मुलांना वेळ दिल्याने आज निर्माण झालेला दुरावा नक्कीच कमी करता येईल. टीव्ही आणि मोबाईलचा अतिरेक कमी करून मुलांसह फिरायला जाणे किंवा बैठे खेळ खेळणे या गोष्टी पालकांना करणे आवश्यक आहे. एसएमएसद्वारे दोन व्यक्ती संपर्कात राहतात. प्रत्यक्ष संवादांपासून मात्र ते दूर आहेत. मात्र एकमेकांची काळजी, कौतुक करणे, जबाबदारी वाटून घेणे हे प्रत्यक्ष संवादातूनच श्क्य आहे. तसे झाले तरच कुटुंबसंस्था टिकेल आणि समाजही. (लेखक कुटुंब समुपदेशक आहेत) (शब्दांकन – रविंद्र पेडणेकर)
</Story>

No comments:

Post a Comment