Friday, 19 July 2013




मित्रहो,
           आजपासून चातुर्मास सुरू होतोय.दरच वर्षी मी काही नेम करून चार महिने वाचन करत असते यावर्षी तुकारामगाथा वाचायचा मानस आहे.दररोजमलाआवडलेलेकाहीतुम्हासर्वांसोबतवाटूनघ्यावेअसाविचार केलायत्यानुसाररोजकाहीतरीलिहीतजाईन. 
           आता सदगुरूतुकाराम समर्थ|
           त्यासी माझा प्रणिपात||
           ज्याने अवतार घेऊन म्रुत्युलोकात|
           दाविला भक्तीपंथ साधका ||


संत तुकाराम हे भागवत धर्माचे एक पुरोगामी विचारग्रणी होते.प्रत्येक कवी आणि लेखक यांची जडणघडण भोवतालच्या परिस्थितीनुरूप घडते Every writer is the product of his age...या सिद्धांताला अनुसरून तुकोबांच्या कार्याचे स्वरुप आणि निवेदन पध्ह्ती यात फरक पडला आहे.तुकारामांच्या विचारात विधायकता जशी आहे,तसा निषेधपरतेचाही भाग आहे.तुकोबा संत-सज्जनांचा गुण-गौरव करतात आणि दुर्जनांचे वाभाडे काढतात. असे हे दंभस्फोटाचे कार्य येरा गबाल्याचे नाही. त्यासाठी निर्भयता निर्भिदता हे दोन गुण अंगी असावे लाग्तात.तुकोबानी सत्य सांगताना कोणाचीही भीड ठेवली नाही.तीन शतके लोटली तरीही तुकारामांचे अभंग काव्य नित्त्यनूतन आणि तरुण आहे. अभिजात काव्यालास्वर्गातील अमृताचा स्पर्श झालेला असतो..one who is not seer can not produce great literature! Tukaram was a seer or a pophet. संत तुकाराम भगवंतांने पाठविलेले लोकसेवक होते.कल्पनेपेक्शा विचाराने तुकारामांचे काव्य महत्वाचे आहे..सहज बोलणे,हित उपदेश..अशा प्रकारातले ते आहे.ते एक लोक-काव्य आहे.जगत्-गुरू तुकोबा आणि त्यांची अभंग गाथा यांना त्रिवार वंदन.

आज पहिले चाळीस अभंग वाचले.
पाहीन श्रीमुख़ आवडीने||सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी



सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी
कर कटावरी ठेवोनिया

तुळसी हार गळा, कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रुप

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने




पुन्हा उद्या भेटूया.
..................................अंजली

मकर कुंडले तळपती श्रवणी|
पुन्हा उद्या भेटूया. कंठी कौस्तुभ मणी विराजीत|| तुका म्हणे माझे हेची सर्व सुख|

1 comment:

  1. दररोजमलाआवडलेलेकाहीतुम्हासर्वांसोबतवाटूनघ्यावेअसाविचार केलाय.
    CHAAN VICHAR KELAY AAPAN.
    ATISHAY STUTYA ...

    ReplyDelete